घरकुल योजना ; घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी अनुदानात 50,000 वाढ…
घरकुल योजना ; आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबांना राज्य आणि केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. गोरगरिब जनतेला स्वतःचे पक्के घर व्हावे यासाठी आर्थिक लाभ दिला जात आहे. घरकुलांसाठी मिळणारे अनुदान खुपच कमी असल्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधी कडून घरकुलांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. (Gharkul scheme 2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत घरकुलांसाठी मिळणाऱ्या अनुदानात 50,000 रूपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याबाबत तरतूद केली जाईल असा अंदाज आहे. वाढत्या महागाई मध्ये घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने घरकुलांसाठी वाढिव अनुदान दिले जाणार आहे. (Devendra fadnavis live)
(घरकुल योजना) आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांना 1,60,000 रूपयांपर्यंत अनुदान मिळत होते परंतु आता यामध्ये 50,000 रूपयांची वाढ होणार असून आता 2,10,000 रूपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. घरकुलांसाठी वाढिव अनुदान मिळणार असल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Gharkul yojna 2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केलेली घोषणा खालील YouTube video मध्ये पहा.