नमो शेतकरी योजना ; आता नमो शेतकरी योजनेतून मिळणार वार्षिक 9000 रूपये..

नमो शेतकरी योजना ; आता नमो शेतकरी योजनेतून मिळणार वार्षिक 9000 रूपये...

नमो शेतकरी योजना ; केंद्र सरकारच्या पिएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पिएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 6000 रूपये दिले जात आहेत. आता या रकमेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमाद्वारे जाहीर केले कि येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सन्मान योजनेत 3000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

पिएम किसान योजनेचे 6000 रूपये आणि नमो शेतकरी योजनेचे 9000 रूपये मिळुन 15,000 रूपये वार्षिक मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली होती त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत घोषणा केली आहे.

पिएम किसान योजनेच्या 19/व्या हप्त्याच्या वितरण सोहळ्यात नागपूर येथील आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि घोषणा केली आहे. पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रूपये दिले जात आहे यामध्ये 3000 रुपयांची भर घातली जाणार आहे आता शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून नमो शेतकरी योजनेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे. येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल…

Leave a Comment