नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रूपये मिळणार का 3000 रुपये….
नमो शेतकरी ; राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत होते. अखेर पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी निधी वितरणासाठी मंजूरी दिली आहे आणि त्याबद्दल अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने लवकरच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे.
यापुर्वी अनेकदा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पिएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत वितरित करण्यात आला होता, परंतु गेल्या पाच महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नसल्याने शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित करत होते.
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना 2000 रूपयाचा मिळणार असून 3000 रूपयाचा हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही तसेच शासन निर्णयांमध्ये कोणताही उल्लेख नाही. नमो च्या पुढील हप्त्याबाबत कोणतीही नवीन अपडेट आल्यास आम्ही आपल्याला त्याबद्दल नक्की माहीती घेऊ. धन्यवाद….