महाडीबीटी पोर्टल : बोअरवेल साठी मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान…

महाडीबीटी पोर्टल : बोअरवेल साठी मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान…

महाडीबीटी पोर्टल : महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर नवीन विहीर, बोअरवेल, शेततळे, मल्चिंग पेपर, सिंचन, पाईपलाईन, जुनी विहीर दुरुस्ती, करण्यासाठी अनुदान दिले जाते. या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शेतात बोअरवेल साठी 50 हजार रुपये अनुदान दिले जात असून यासाठी कागदपत्रे, निकष काय लागतात तसेच अर्ज कसा करावा आणि अनुदान किती मिळणार याबाबत सविस्तर माहिती पाहुयात. (महाडीबीटी पोर्टल)

बोअरवेल साठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

1) अर्जदाराचे आधार कार्ड
2) जातीचा दाखला
3) उत्पन्नाचा दाखला
4) 7/12 उतारा
5) आठ’अ
6) दारिद्र्य रेषेखालील कार्ड
7) अर्जदाराचे 100 च्या बॉंडवर प्रतिज्ञापत्र
8) शेतात पाण्याचा स्रोत नसल्याचा तलाठ्याचा दाखला

बोअरवेल साठी अटी निकष खालील प्रमाणे – (महाडीबीटी पोर्टल)

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा, शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा जास्त नसावे, शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असावे. (महाडीबीटी पोर्टल)

महाडीबीटी पोर्टल

Leave a Comment