माणिकराव कोकाटे ; कृषीमंत्र्याना 50 हजार दंड आणि दोन वर्षांची शिक्षा का झाली…
माणिकराव कोकाटे ; राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 50 हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर दरम्यान एक तासात कोकाटे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने का शिक्षा सुनावली पाहुया नेमके काय आहे प्रकरण…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 ते 1997 या कालावधीत खोटे कागदपत्रे सादर करुन मुख्यमंत्री निधीतून घर मिळवले होते. कोकाटे यांच्यावर मंत्री दिघोळे यांनी तक्रार याचीका दाखल केली होती. याप्रकरणी तब्बल 30 वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने आज दि. 20/फेब्रुवारी/2025 रोजी निकाल दिलाय. या निकालात कोर्टाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना प्रत्येकी 50 हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
माणिकराव कोकाटे हे सध्या आमदार असुन राज्याचे कृषीमंत्री आहेत. कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली असल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा तसेच त्यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
या निकालावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की उच्च न्यायालयाने याचीका दाखल करून न्याय मागणार त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल…