लाडकी बहिण योजना ; फेब्रुवारीचा हप्ता जमा न होण्याचे कारण आले समोर…
लाडकी बहिण योजना ; राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत 10,500 रूपये मिळले आहेत आणि आता महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
आज 26/फेब्रुवारी संपत आला असून अद्यापही महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. लाडकी बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता का मिळाला नाही याबद्दल महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
अद्यापही फेब्रुवारीचा हप्ता का जमा झाला नाही?
लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू असून हि पडताळणी अजून पुर्ण झाली नाही. अर्जाची तपासणी पुर्ण झाल्यावर लाडकी बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल असे सांगितले जात आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे…
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता अर्जाची पडताळणी पुर्ण झाल्यावर जमा होईल. अर्ज पडताळणी पुर्ण होण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागु शकते. फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये वितरीत होऊ शकतो. तसेच तांत्रिक अडचण दुरूस्त होताच फेब्रुवारीचा हप्ता वितरण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली आहे.