लाडकी बहिण योजना ; फेब्रुवारीचा हप्ता मिळाला मार्चचा कधी, आदिती तटकरे
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता महिला दिनी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करायचे होते. परंतु फक्त फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला असल्याने महिला नाराज आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे. आता महिलांना मार्चचा हप्ता कधी जमा होणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली होती की फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे हप्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनी बँक खात्यात जमा केले जातील. मात्र, फक्त 1500 रुपये जमा झाले असल्याने लाभार्थी महिलांची निराशा झाली आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की तांत्रिक अडचणी मुळे महिलांना फक्त फेब्रुवारीचा हप्ता जमा केला आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण झाले कि मार्चचा हप्ता वितरण करण्यात येईल.