Lek Ladki Yojana लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 75,000 पात्रता,नोंदणी,कागदपत्रे, संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 75,000 पात्रता,नोंदणी,कागदपत्रे, संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana Maharashtra महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. अर्थसंकल्पात तात्कालिक अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस या या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा शासन निर्णय (GR) आला आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे तसेच या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि या योजनेचे फायदे काय आहेत व या योजनेचा अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया.

(Lek Ladki Yojana Maharashtra) लेक लाडकी योजना महाराष्ट्र ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करून त्यांना शिक्षण आणि इतर विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

लेक लाडकी योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

🟣 मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.

🟣 मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.

🟣 सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.

🟣 मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.

🟣 लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील. (Lek Ladki Yojana Maharashtra)

लेक लाडकी योजना साठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:

🔵 लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
🔵 राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
🔵 या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
🔵 लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

 

लेक लाडकी योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

🔷 लाभार्थी चा जन्म दाखला.

🔷 उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे)

🔷 लाभार्थीचे आधार कार्ड

🔷 पालकांचे आधार कार्ड

🔷 बँक पासबुक

🔷 रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)

🔷 मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

🔷 संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)

🔷 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

🔷 अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)

लेक लाडकी योजना 2023 साठी अर्ज खालीलप्रमाणे करू शकता:

ऑनलाइन अर्ज: महाराष्ट्र सरकारच्या https://mahaonline.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज: आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता.

Leave a Comment