Monsoon 2025 : यंदाही सरासरी एवढा पाऊस हवामान तज्ञ रामचंद्र साबळे…
Monsoon 2025 : जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मान्सून बाबत अंदाज व्यक्त केलाय. साबळे म्हणतात हवेत co2 चे प्रमाण 0.01% एवढे वाढल्याने यंदा उन्हाळा कडक जाणार असून उन्हाळ्याची चाहुल फेब्रुवारी मध्येच लागली आहे. यंदा एप्रिल मे मध्ये तापमान 2 अंशानी वाढेल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी मान्सून बद्दल उत्सुकता असते. यंदा पाऊस कसा असेल या प्रश्नावर साबळे म्हणाले की यंदा उन्हाळा कडक असल्याने सरासरी एवढे पर्जन्यमान असेल. तसेच यंदाच्या मान्सून साठी (2025) ला निना पोषक असल्याने मान्सुनकाळात चांगला फायदा होईल. चांगला पाऊस असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वाढत्या तापमानावर चिंता व्यक्त केलीय. तापमान वाढ थांबवण्यासाठी झाडे लागवडीला प्राधान्य देणे अतिशय आवश्यक आहे. यंदा तापमान 2 अंशानी वाढुन 46 अंशावर जाईल असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.
मार्च एप्रिल मध्ये अवकाळी पाऊस होईल का ❓
साबळे यांनी सांगितले की यंदा मान्सून साठी पोषक वातावरण असुन तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढल्याने मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या अवकाळी पावसाचे प्रमाण खुपच कमी असेल.