Maharashtra budget 2025 ; राज्य अर्थसंकल्प 10/मार्चला महिला, शेतकऱ्यांना काय अपेक्षा..
Maharashtra budget 2025 ; राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित केली असून 10/मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 03/मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल तर 23/मार्च पर्यंत अधिवेशन सुरू राहील. राज्य अधिवेशनात अर्थमंत्री कोणत्या घोषणा करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील जनतेचे राज्य अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका भाषणात सांगितले होते की राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प कठोर असेल. या अर्थसंकल्पात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असेही उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलेले आहे. (Maharashtra budget 2025)
राज्य सरकार नुकतेच सत्तेवर आले असून निवडणुकीपुर्वी केलेल्या घोषणाची पुर्तता सरकार कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रूपये प्रति महिना, नमो शेतकरी योजनेचा निधीत वाढ होणार, कापूस सोयाबीन हमीभावात वाढ या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. या सर्व घोषणा लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी होत आहे. (maharashtra govorment 2025)
या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना तसेच शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पुर्ण व्हावीत अशी अपेक्षा आहे. 10/मार्च रोजी कोणत्या घोषणा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (budget 2025)