banavati khate ; बनावट खत ओळखायचे कसे?आपण अस्सल खते वापरतोय का ?

 banavati khate ; बनावट खत ओळखायचे कसे ? आपण अस्सल खते वापरतोय का ?

 

banavati khate ; नमस्कार शेतकरी बांधवांनो यावर्षी बाजारात बनावट खताची व बियाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे. खरी आणि बनावट खते ओळखण्याचे काही साधेसोपे मार्ग जाणुन घेऊया. आता खरीप पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरु आहे. डिएपी,युरीया, पोटँश, एनपीके आदी खते शेतकरी खरेदी करत असतात.

 

दरवर्षी खताचे दर सुद्धा खुप मोठ्या प्रमाणावर वाढत असुन भेसळयुक्त खते बाजारात असल्याने जास्त खताचा वापर करुनही चांगले उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.  कुठेतरी बनावटी खत हे जास्त जबाबदार आहे.आपण झाडाला जे खत टाकतोय ते खत खरे आहे की बनावट याबद्दल शेतकरी चिंतेत आहेत. अशा परीस्थिती मध्ये बनावट खत ओळखने हे खुप महत्वाचे आहे,तर बनावट खत ओळखण्याचे सोपे उपाय जाणुन घेऊया. शेतकर्याने खते खरेदी करण्यापुर्वी बनावटी आणी खरे खते ओळखली पाहीजे. आणि नंतरचा खते खरेदी करावी.

बनावट पोटँश ओळखण्याचे कसे – Potesh पोटँशच्या काही दाण्यावर पाण्याचे काही पाण्याचे थेंब टाका.पाणी टाकल्यानंतर ते एकत्र चिकटले गेले तर ते नकली पोटँश आहे असे समजुन घ्या.कारण पोटँशचे दाणे पाणी टाकल्यानंतर चिकटत नाहित.

ओरिजनल पोटँश ओळखण्याचे उपाय – पांढरे मिठ आणी लाल तिखट यांचे मिश्रण हिच खर्या पोटँशची ओळख आहे.खरे पोटँश धान्य नेहमीच फुलतात.

DAP बनावट डिएपी खत ओळखण्याचे कसे – DAP डिएपी दानेदार आणि टनक व रंग तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो.नखाने तोडण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर तुटनार नाही. सहज फुटले तर हे खत पुर्णपणे बनावट आहे असे समजुन घ्या.

ओरिजनल डिएपी DAP खत ओळखण्याचे उपाय – डिएपी dap खत खरेदी करताना ते खरे आहे बनावट हे ओळखण्यासाठी काही डिएपी चे दाने हातात घेऊन त्यात चुना मिसळुन काही वेळ मँश करा.ते मँश कल्यावर जर वास येऊ लागला आणी त्याचा वास घेणे खुप कठीण झाले तर हे डिएपी खत खरे आहे हे समजुन घ्या.

बनावट युरीया ओळखण्याचे उपाय – युरीया तव्यावर गरम करा गरम केल्यानंतर त्यातील दाने वितळले नाहित तर ते युरीया खत बनावट आहे असे समजुन घ्या ,कारण गरम केल्यानंतर युरीया चे दाने सहज वितळतात.

खरे युरीया खत ओळखण्याचे उपाय – युरीया चे दाने पांढरे ,चमकदार व एकसारख्या आकाराचे गोलाकार असतात.ते पाण्यामधे पुर्णपणे विरळतात त्याचे द्रावन स्पर्शास थंड वाटते. हा युरीया खरा आहे असे समजुन घ्या.

शेतकरी मित्रांनो आपले नुकसान टाळण्यासाठी व चांगले उत्पादन मिळविण्यासाठी आपल्याला अस्सल खते वापरणे आवश्यक आहे तरी खते खरेदी करताना आपण ही काळजी अवश्य घ्यावी. म्हणजे आपले नुकसान टाळता येईल. सध्या बनावट खते बियाण्याचा साठा जप्त केलेल्या बातम्या आपण दररोज पाहत आहोत तरी आपण हि सावधानता बाळगावी.. धन्यवाद (banavati khate)

Leave a Comment