Budget 2025/26 राज्य अर्थसंकल्प सादर महिलांना 2100 रूपये मिळणार का…
Budget 2025/26 ; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दि. 10/मार्च रोजी 2025/26 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना दिला जाईल अशी घोषणा केली होती. अर्थसंकल्प 2025/26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.
अर्थसंकल्प 2025/26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रूपये महिना मिळणार असून 2100 रूपये मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी केलेल्या तरतुदीनुसार लाडक्या बहिणींना महिन्याला फक्त 1500 रूपये मिळणार आहे.
राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागले होते. परंतु अजित पवार यांनी लाडक्या बहिण योजनेचा निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल असेही अजित पवार यांनी एका भाषनासंदर्भात सांगितले होते.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की जाहिरनामा हा पाच वर्षासाठी असतो, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील सध्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार लाडक्या बहिणींना 1500 रूपये महिना मिळेल.