Weather Update : पुढील 48 तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा…
Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. तसेच काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पाहुया सविस्तर हवामान अंदाज…
विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे. यासोबतच अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. आज संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा अंदाज असून सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
20 Mar, 11.45 hrs, latest satellite obs indicate scattered type convective thunder cloud belt over adjoining areas of #Marathavada, #North_interior_Karnataka and #North_Telangana.
Possibility of light rains to cont at isol places during next 2,3 hrs.
Pl watch for IMD updates. pic.twitter.com/c4ClqBOZow— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 20, 2025
हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश,पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान वाऱ्याचा ताशी वेग 50 ते 60 किमी एवढा असेल. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसात हे वारे आणि विजा अधिक असतात त्यामुळे सावधान रहावे तसेच पाऊस सुरू असताना झाडाचा अश्रय घेऊ नये.