Yallow mojek soyabin ; सोयाबीन पिवळी झाल्यास लवकर करा हि फवारणी…

Yallow mojek soyabin ; सोयाबीन पिवळी झाल्यास लवकर करा हि फवारणी…

Yallo mojek soyabin ; सोयाबीनची पेरणी होऊन साधारणता 20 दिवसाचा कालावधी झाला आहे. या अवस्थेत विविध कारणांमुळे सोयाबीन पिवळे पडल्याचे दिसत आहे. सोयाबीन पिवळे पडल्यावर हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया योग्य होत नाही आणि पिकांची चांगली वाढ होत नाही. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडत असल्यास लवकर आवश्यक उपाययोजना कराव्या नाहीतर रोपात मर होऊन उत्पादनात मोठी घट होते. सोयाबीन पिवळे पडल्यास कोणत्या औषधाची फवारणी करावेत पाहुया…

सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे सोयाबीन पिवळी का पडते…

1) सततच्या पावसामुळे चिभाड जमिनीत शेतात जर जास्त दिवस पाणी साचुन राहत असेल तर त्या शेतात सोयाबीन पिवळी पडते.

2) चुनखडयुक्त जमीन असल्यास आणि पाण्याचा निचरा योग्य होत नसल्यास सोयाबीन पिवळी पडते..

3) जमीनीला लोह, पालाश, झिंक सल्फेट आणि नत्र या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळी पडते.परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळी पडल्यास पानाच्या शिरा हिरव्या दिसतात.

4) पिकात नुकतेच तननाशक फवारणी केली असल्यास तणनाशकाच्या फवारणी नंतर तणनाशकाचे प्रमाण जास्त झाल्यावर सोयाबीन पिवळी पडते. Yallo mojek soyabin

सोयाबीनचे पिक पिवळे पडल्यावर त्यावर कोणत्या उपाय योजना कराव्यात…

1) पावसाचे शेतात जर पाणी साचलेले असेल तर ते पाणी शेतातून बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

2) 19-19-19 या विद्राव्य खतासोबत झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल तर इमामेक्टिन 10gm घ्यावे..

3) झिंक सल्फेट + फेरस सल्फेट ची फवारणी करावी खोडकिडीचा प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन 10gm घ्यावे.

4) सोयाबीनवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे का चेक करावे. पांढऱ्या नियंत्रण साठी पोलो या फवारणी करावी.

वरील प्रमाणे उपाययोजना केल्यास व शेतात वापसा झाल्यानंतर सोयाबीन मधिल पिवळेपणा कमी होतो. यलो मोजेक वर योग्य वेळेत उपाय योजना केल्या नाहीत तर सोयाबीनचे पिक पुर्ण पणे खराब होऊन उत्पादनात मोठी घसरण होते….

Leave a Comment