लाडकी बहिण योजना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या महिन्यापासून 2100 रूपये मिळणार..

लाडकी बहिण योजना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या महिन्यापासून 2100 रूपये मिळणार…

लाडकी बहिण योजना – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दि. 10/मार्च/2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यानी सर्व विभागासाठी निधीची तरतूद केली आहे. यामध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 31907 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बजेटमध्ये केलेल्या तरतुदीनुसार लाडक्या बहिणींना 1500 रूपये दर महिन्याला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जेव्हा लाडक्या बहिणींना 2100 मिळणार त्याआधी आम्ही जाहीर करु कि पूढील महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळणार. लाडकी बहिण योजना

लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार – अजित पवार

पत्रकारांनी अजित पवार यांना 2100 कधीपासून मिळणार असे विचारले असता पवार म्हणाले की आम्ही सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे आश्वासन दिले होते परंतु लगेच देऊ असे सांगितले नाही. लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे परंतु सध्या लाडक्या बहिणींना 1500 रूपये मिळत राहतील. 2100 रूपये देण्याबाबत सरकार लवकरच घोषणा करील.

अर्थसंकल्प सादर होताच लाडक्या बहिणींना सध्या 1500 रूपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना वाट पहावी लागणार आहे. सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार असल्याने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Comment